राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘दारू नको दूध प्या’ आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली. सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गेली १२ वर्षे दिनांक ३१ डिसेंबरच्या निमित्याने सामाजिक उपक्रम अविरतपणे सुरू आहे. तरुण पिढी व्यसनाकडे वळण्यासाठी दारू नको दूध प्या या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन दरवर्षी  करण्यात येते. यंदाही या उपक्रमाला सर्वांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील, युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुल पवार, मेनुद्दीन बागवान, मिरज पोलीस उपअधिक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक महेश चिकने, आयुब बारगीर, सागर घोडके, हरिदास पाटील, ज्योती आदाटे, अनिता पांगम वंदना चंदनशिवे, आशा पाटील, प्रियांका तूपलोंढे, पूजा कोलप, उत्तम कांबळे, शुभम जाधव, ऋषिकेश कांबळे, प्रफुल्ल जाधव संदीप कांबळे, सोमनाथ, सूर्यवंशी अकबर शेख, जुनेद जमादार, कुमार वायदंडे, शुभम ठोंबरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा सचिव मनोज भिसे यांनी केले.