पोलिस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांचा एव्हरेस्टवर झेंडा ; महाराष्ट्र पोलीस दलाचच्या शिरपेचात मानाचा तुरा

एव्हरेस्ट सर करणारे महाराष्ट्र पोलिस खात्यातील तिसरे व्यक्ती ठरले आहेत. यापूर्वी फक्त दोघांना त्यांच्यापूर्वी ही कामगिरी जमली आहे. तर ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातले पहिले व्यक्ती ठरले आहेत.

    सांगली: महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेले सांगली पोलिस उपनिरीक्षक संभाजी गुरव (Sambhaji Gurav) यांनी अत्यंत कठीण असलेल्या एव्हरेस्ट शिखराला (Mount Everest) गवसणी घातली आहे. एव्हरेस्ट सर करणारे महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) खात्यातील तिसरे व्यक्ती ठरले आहेत. यापूर्वी फक्त दोघांना त्यांच्यापूर्वी ही कामगिरी जमली आहे. तर ते सांगली (Sangali) जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातले पहिले व्यक्ती ठरले आहेत.

    पोलीस सब इन्स्पेक्टर असलेले संभाजी गुरव सध्या मुंबई पनवेल येथे कार्यरत आहेत. धाडसी व्यक्तिमत्व म्हणून पोलीस खात्यामध्ये त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांच्या सुहेल शर्मा आणि रफीक शेख यांनीही एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केली आहे. त्यांच्या ‘या’ यशावर वाळवा तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या महिन्यात म्हणजे ६ एप्रिलला ते मुंबईहून निघाले. त्यानंतर संपूर्ण मोहीम यशस्वीपणे पूर्ण करत त्यांनी अखेर २३ एप्रिल २०२१ रोजी एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा पुन्हा एकदा फडकावला.
    जगातील सर्वोच्च पर्वतरांग असलेल्या ८८४८ मीटर उंच एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. संभाजी गुरव यांनी २०१९ मध्ये सर्वात आधी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ऑक्सिजन सिलेंडर आणि इतर सर्व साहित्य बरोबर असूनही तब्येतीने साथ दिली नाही म्हणून त्यांना एव्हरेस्ट मोहीम अर्ध्यावर सोडून घरी परतावे लावले होते पण त्यांनी एव्हरेस्ट सर करायचा निर्धार केला होता. त्यामुळे त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले. तिसऱ्या प्रयत्नात त्यांचे एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पूर्ण झाले.