सुशांत सिंह याचे लफडेबाज जीवन असू शकते त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असावी : संभाजी भिडे

सांगली:  अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushantsingh rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाबाबत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.  सुशांतसिंहबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य घालवण्यासारखच आहे. त्यामुळे या विषयावर बोलायलाच नको, सुशांत हा बेकार माणूस आहे, जर या प्रकरणाच्या  खोलात गेलं तर काही तर त्याचे  लफडेबाज जीवन असेल आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केली असेल,’ असं संभाजी भिडे  (sambhaji bhide)यांनी म्हटलं आहे.प्रसारमाध्यमांशी बोलताना  संभाजी भिडे यांनी ही  प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

आज आपल्या समाजावर दुर्देवाने हिरो आणि हिरोइनचा प्रभाव आहे. आपला समाज यांचाच आदर्श घेतो मात्र सिनेमातील या नट-नट्याची पात्रता काय? लायकी काय? त्यांची उंची काय? या नटनट्यांची लायकी काय आहे? त्यांची पात्रता काय? उंची किती ?  १३० कोटी देशाचे नागरिक जर यांचा आदर्श घेत असतील तर  याचा अर्थ हा  देश लवकरच वाटोळं करून घेणार  हे निश्चित आहे. असं संभाजी भिडे म्हणाले.