एफआरपी आंदोलना दरम्यान स्वाभिमानी आणि पोलिसांच्या मध्ये झटापट…

त्या कारखान्याच्या ऊस टाकण्यात येणाऱ्या गव्हाणी मध्ये उडया टाकण्याचा आंदोलन जाहीर करण्यात आलं होतं. सांगलीतल्या दत्त इंडिया शुगर संचलित वसंतदादा साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. आक्रमक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दत्त इंडिया कारखान्यावर यावेळी मोर्चा काढत,जोरदार घोषणाबाजी केली. 

सांगली:  एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी सांगली मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले आहे.सांगलीतील दत्त इंडिया संचालित वसंतदादा पाटील साखर कारखान्यासमोर यावेळी झालेल्या आंदोलना दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठी झटापटीचा प्रकार घडला.

एकरकमी एफरआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक..

सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्याकडून एकरकमी एफआरपी देण्याच्या शब्द देण्यात आला होता.मात्र जिल्ह्यातील तीन कारखाने वगळता अन्य कारखान्यांकडून एफआरपी देण्याबाबत तडजोडीची भूमिका घेण्यात येत आहे.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत पुन्हा आंदोलन छेडले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कारखानदार एकआरपी देणार नाहीत,
त्या कारखान्याच्या ऊस टाकण्यात येणाऱ्या गव्हाणी मध्ये उडया टाकण्याचा आंदोलन जाहीर करण्यात आलं होतं. सांगलीतल्या दत्त इंडिया शुगर संचलित वसंतदादा साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. आक्रमक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दत्त इंडिया कारखान्यावर यावेळी मोर्चा काढत,जोरदार घोषणाबाजी केली.  आक्रमक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी साखर कारखान्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना कार्यकर्त्यांना रोखले,त्यामुळे स्वाभिमनीचे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली.त्यामुळे घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

१० दिवसात एकरकमी देण्याची ग्वाही…

तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखाना परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
दरम्यान कारखाना प्रशासनाकडून यावेळी दहा दिवसांमध्ये एकरकमी एफरआर देण्याची ग्वाही देण्यात आली, त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गव्हाणी तून उड्या टाकण्याचा आंदोलन स्थगित केलं.

 अन्यथा गनिमकाव्याने उड्या टाकू..

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले , जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पावसाचा हंगाम सुरू होताना बैठकीमध्ये एकरकमी देण्याबाबत मान्य केलं होतं. मात्र जिल्ह्यातल्या चार साखर कारखान्यांकडून एक रकमी देण्यात आलेली आहे,उर्वरित साखर कारखानदारांच्याकडून असमर्थता दर्शवत टप्प्याटप्प्याने एफरआरपी देण्याची भूमिका घेण्यात येत आहे. सगळे कारखान्यांच्या गव्हाणीमध्ये उद्या टाकण्याचे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हाती घेण्यात आलेला आहे. मात्र पोलिसबळाचा वापर करत आंदोलन करण्यात येत असल्याचा आरोप खराडे, यांनी करत,यापुढे जे कारखाने एफरआरपी देण्यास असमर्थता दर्शवतील, त्या कारखान्यांच्या गव्हाणीमध्ये गनिमी काव्याने उड्या टाकून जीव देण्यात येईल, असा इशारा दिला आहे.