सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी स्वाती देशमुख

    सांगली : गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी म्हणून डॉ. स्वाती देशमुख रुजु होणार आहेत. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख सांगलीत निवडणूक विभागाकडे उपजिल्हाधिकारी म्हणून दोन वर्षे पदावर काम पहात होत्या.

    जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांची भुदरगड येथे प्रांताधिकारी तर महसूल उपजिल्हाधिकारी विजया यादव यांची सातारा येथे बदली झाली आहे. तासगावच्या तहसिलदार कल्पना ढवळे यांची हातकणंगले येथे तहसिलदार म्हणून व इस्लामपूर तहसिलदार रवींद्र सबनीस यांची जुन्नर येथे तहसिलदार म्हणून बदली झाली आहे.

    सांगली भूमिसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून किरण कुलकर्णी पुन्हा सांगलीत येत आहेत. यापुर्वी त्यांनी रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी पदावर सांगलीत काम पाहिले आहे.