सांगलीत काँग्रेसला घरचा आहेर ; काँग्रेसच्या शहर महिला जिल्हाध्यक्ष वहिदा आयाज नायकवडी यांचा पदाचा राजीनामा

सांगली आणि शहर कुपवाड महानगरपालिकेत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. काँग्रेस मध्ये दलित आणि मुस्लिम समाजाचा केवळ मतासाठी वापर केला जातो, मात्र पद देताना जातीयवाद केला जातो. भाजपा पेक्षा काँग्रेसच ज्यास्त जातीयवादी पक्ष आहे. अशी टीका काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते आणि जेष्ठ नेते आयाज नायकवडी यांनी केली आहे. पक्षाचा राजीनामा दिला असून काँग्रेसी विचारधारेच्या अन्य पक्षात जाणार असल्याच त्यांनी सांगितलं आहे.

    सांगली : एकीकडे काँग्रेसची सातत्याने पीछेहाट होत असताना, जिल्ह्यात देखील काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आलं आहे. काँग्रेसच्या शहर महिला जिल्हाध्यक्ष वहिदा आयाज नायकवडी यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करीत आपल्या पदाचा राजीनामा आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

    वहिदा नायकवडी यांच्याकडे महिला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती, त्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या विद्यमान नगरसेवक देखील आहेत. तसेच त्यांचे पती अय्याज नायकवडी हे वसंतदादा गटाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देखील आहेत.

    सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या विरोधीपक्ष नेते पदाची निवड कालच पार पडली, यामध्ये नायकवडी यांनी देखील आपला दावा सांगितला होता, मात्र मंत्री विश्वजित कदम यांच्याकडून संधी डावलण्यात आली असल्याचा आरोप करीत नायकवडी यांनी पक्ष त्याग केला आहे.

    सांगली आणि शहर कुपवाड महानगरपालिकेत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. काँग्रेस मध्ये दलित आणि मुस्लिम समाजाचा केवळ मतासाठी वापर केला जातो, मात्र पद देताना जातीयवाद केला जातो. भाजपा पेक्षा काँग्रेसच ज्यास्त जातीयवादी पक्ष आहे. अशी टीका काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते आणि जेष्ठ नेते आयाज नायकवडी यांनी केली आहे. पक्षाचा राजीनामा दिला असून काँग्रेसी विचारधारेच्या अन्य पक्षात जाणार असल्याच त्यांनी सांगितलं आहे.

    राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

    काँग्रेसचे जेष्ठ नेते अय्याज नायकवडी आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका वहिदा नायकवडी हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत, राष्ट्रवादी कडून सध्या सर्व पक्षातील नाराज नगरसेवकांवर नजर आहे. मंत्री जयंत पाटील आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे नगरसेवक आपल्या पक्षात घेतील.