पावसाचा जोर ओसरला, कृष्णा नदीची पाणी पातळी २३ फुटांवर स्थिर

  • पावसाचा जोर थांबल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी २३ फुटांवर स्थिर झाली आहे. सध्या गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पाऊस व पाण्याची आवक कमी झाली आहे अशी माहिती कोयना सिंचन विभागाकडून कळवण्यात आली आहे. मात्र चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी होत आहे.

सांगली: सांगली आणि कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी आणि पंपगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली होती. परंतु आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे सांगलीत कृष्णा नदी तर कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत कमी झाल्याचं दिसत आहे. पावसाचा जोर थांबल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी २३ फुटांवर स्थिर झाली आहे. सध्या गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पाऊस व पाण्याची आवक कमी झाली आहे अशी माहिती कोयना सिंचन विभागाकडून कळवण्यात आली आहे. मात्र चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी होत आहे.

सांगली जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम सांगली जिल्ह्यात दाखल झालेल्या आहेत. त्यामध्ये एक टीम सांगली शहरात तर दुसरी टीम आष्टा येथे तैनात करण्यात आली आहे. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून महापूर बांधित जिल्ह्यात कोरोनाबरोबरच आपत्ती व्यवस्थापनला महत्व दिलेले आहे.

दरम्यान, काल गुरूवारी सायंकाळच्या दरम्यान राधानगरी धरणाचे आणखी दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे पंचगंगेची  पाणीपातळी वाढण्याचा वेग काहीसा मंदावला आहे.