महाराष्ट्रातील परिस्थिती तालिबानपेक्षा वेगळी नाही; सदाभाऊ खोतांची सरकारवर जहरी टीका

बैलगाडी शर्यतीच्या मुद्यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तालिबानसारख्या चौक्या उभ्या करून बैलगाडी शर्यती पोलिस बळावर चिरडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आमदार खोत यांनी केला आहे.

    सांगली : बैलगाडी शर्यतीच्या मुद्यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तालिबानसारख्या चौक्या उभ्या करून बैलगाडी शर्यती पोलिस बळावर चिरडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आमदार खोत यांनी केला आहे.

    खोत यांना झरे या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीला जाताना पोलिसांकडून रोखण्यात आले होते. मात्र पोलिसांचे नाकेबंदी झुगारून खोत झरे याठिकाणी पोहचले. येथे आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.