हळदीचा रंग उतरण्याआधीच तरूणाने केली आत्महत्या, काय आहे कारण?

चार दिवसांपूर्वी मृत तरुणाचं लग्न झालं होतं. लग्नातील हळदीचा रंगही अजून उडाला नव्हता, तोपर्यंत या तरुणाने असं धक्कादायक पाऊल उचललं आहे. याप्रकरणामुळे संबंधित कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला आहे. लग्नासाठी आलेली पाहुणे मंडळीही अजून गेली नव्हती, तोपर्यंत आलेल्या या दुःखद घटनेनं संपूर्ण परिवराला दुःख सागरात लोटलं आहे.

    तासगाव : सांगली जिल्ह्यात एका तरुणाने लग्नाच्या (Marriage) अवघ्या चौथ्या दिवशीचं मृत्यूला कवटाळलं. त्याने शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली (Young Man commits Suicide) आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. या घटनेची पुढील कार्यवाही तासगाव पोलीस करत आहेत.

    चार दिवसांपूर्वी मृत तरुणाचं लग्न झालं होतं. लग्नातील हळदीचा रंगही अजून उडाला नव्हता, तोपर्यंत या तरुणाने असं धक्कादायक पाऊल उचललं आहे. याप्रकरणामुळे संबंधित कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला आहे. लग्नासाठी आलेली पाहुणे मंडळीही अजून गेली नव्हती, तोपर्यंत आलेल्या या दुःखद घटनेनं संपूर्ण परिवराला दुःख सागरात लोटलं आहे. संबंधित तरुणाने आत्महत्या का केली? याच नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून पोलीस आत्महत्येच्या कारणाचा तपास करत आहेत.