मोदी साहेबांकडून खूप अपेक्षा होती, पण काहीचं मिळालं नाही; जयंत पाटील यांनी व्यक्त केली खंत

केंद्र सरकारकडून जीएसटी ची रक्कम येण्यास उशीर होत आहे. बरेच पैसे प्रलंबित आहेत. त्यामुळे काही प्रश्न तयार झालेत. असं पाटील बोलतं होते.

    सांगली : आम्हाला नरेंद्र मोदी साहेबांच्या कडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांनी वीस लाख कोटींचे पॅकेज जाहीर केलं होतं. त्यातलं काहीच आलं नाही. शेवटी ते देशाच्या पंतप्रधान यांनी जाहीर केलेलं पॅकेज आहे. केंद्र सरकारकडून आम्हाला फुल ना फुलाची पाकळी येईल असे वाटत होते, पण अजून काही आलेलं नाही, अशी खंत मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

    दरम्यांन केंद्र सरकारकडून जीएसटी ची रक्कम येण्यास उशीर होत आहे. बरेच पैसे प्रलंबित आहेत. त्यामुळे काही प्रश्न तयार झालेत. असं पाटील बोलतं होते. यावेळी जयंत पाटलांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.

    म्हणाले की, फडणवीस यांनी जगाचा चांगला अभ्यास केलेला दिसतोय. परदेशात लॉकडाउन आणि राबवलेली धोरणे याचं त्यांनी वारेमाप कौतुक केलं आहे. पण त्यांनी त्यात भारताचा उल्लेख केलेला नाही. भारताचा उल्लेख न केल्यामुळे मला थोडी शंका आली. त्यांनाही असे वाटत असावे, की परदेशात जशी धोरणे राबवण्यात आली तशी भारतात राबवली गेली नाहीत. असेच त्यांना सूचित करायचे असावे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.