gopichand padalkar
gopichand padalkar

सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानासुद्धा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील झरे येथे उद्या 20 ऑगस्टला बैलगाडी शर्यत आयोजित करणार असल्याचं जाहीर केले आहे. बैलगाडी शर्यत होणार नाही याबाबत जिल्हा प्रशासनाने कायदेशीर कारवाया सुरू केल्या. सुरवातीला नाका-बंदी त्यानंतर झरे गावच्या आसपास परिसरातील नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर या परिसरातील रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली.

    सांगली : सांगली जिल्ह्यात गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यती(bullock cart race in Sangli) होण्याची शक्यता आहे. प्रशासन सर्व शक्यता गृहीत धरून सज्ज असून कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यती होणार असल्याची गर्जना आमदार गोपीचंद पडळकर(MLA Gopichand Padalkar) यांनी केली आहे.

    सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानासुद्धा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील झरे येथे उद्या 20 ऑगस्टला बैलगाडी शर्यत आयोजित करणार असल्याचं जाहीर केले आहे. बैलगाडी शर्यत होणार नाही याबाबत जिल्हा प्रशासनाने कायदेशीर कारवाया सुरू केल्या. सुरवातीला नाका-बंदी त्यानंतर झरे गावच्या आसपास परिसरातील नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर या परिसरातील रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली.

    स्पर्धेचे ठिकाण आणि संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र तरीही बैलगाडी शर्यती या गनिमीकाव्याने अन्य ठिकाणी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी 15 बैलगाड्या अज्ञात स्थळी ठेवल्याची सुद्धा चर्चा आहे. सांगलीच्या आसपास जिल्ह्यातून भाजप नेते बैलगाड्या घेऊन झरेच्या दिशेने निघाले असल्याचेही समजते.

    कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यती होणार असल्याची आमदार गोपीचंद पडळकर यांची गर्जना – पाहा व्हिडिओ