चैनीसाठी वाट्टेल ते ! आलिशान गाडीतून यायचे अन् शेळ्या चोरायचे; पोलिसांनी घातल्या बेड्या

    सांगली : चैनीसाठी बोकड चोरणाऱ्या एका टोळीला इस्लामपूर पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी ५ जणांना अटक करून त्यांच्याकडून चार बोकड-शेळी आणि एक आलिशान गाडी हस्तगत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आलिशान गाडीतून या टोळीकडून बोकड-शेळ्या चोरण्याचा उद्योग करण्यात येत होता.

    अटक करण्यात आलेला आरोपी फक्त चैनीसाठी बोकड चोरी-इस्लामपूर येथील एका टोळीकडून केवळ चैनीसाठी शेळ्या-बोकड चोरण्याचा प्रकार समोर आला आहे. संपूर्ण पोलिसांनी या बोकड चोरी टोळीचा पर्दाफाश करत पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून इस्लामपूर परिसरामधील शेळी आणि बोकड चोरीच्या घटना सुरू होत्या. इस्लामपूर पोलीस करत असलेल्या तपासादरम्यान नरसिंहपूर येथील एका टोळीकडून या शेळी आणि बोकड चोरीचा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर या टोळीच्या पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी शेळ्या आणि बोकड चोरी केल्याची कबूली दिली.

    दरम्यान, अजित पांडूरंग सुर्वे (वय २९), अजय रघुनाथ झीमुर (वय २९), अभिषेक कैलास गोतपागर (वय ३०), धनंजय आनंदा कांबळे (वय २९), किरण दिपक लोहार (वय २९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.