व्यापाऱ्यांचे उद्या सांगलीत भीक मांगो आंदोलन ; कोरोना निर्बंधामुळे जगणे झाले मुश्किल

सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढली आहे. टास्क फोर्सने अर्धवट लॉकडाऊनचा सल्ला दिल्याने रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे हा टास्क फोर्सच मुख्यमंत्र्यांनी बरखास्त करावे. स्थानिक पातळीवर जिल्हा निहाय समिती स्थापन करून त्यांच्याशी चर्चा करून उपाययोजना आखाव्यात, अशी मागणीही शहा यांनी केली.

  सांगली : कोरोना नियंत्रणात प्रशासनाला अपयश येत आहे. अशा परिस्थितीत सातत्याने कडक निर्बंध लादले जात आहेत. दुकाने बंद असल्याने बँकेचे हते, व्याज, कर्मचाऱ्यांचे पगार, घर खर्च चालवणे मुश्किल झाले आहे. त्याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सांगलीत हरभट रोड येथे बुधवारी भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी दिली.

  व्यापारी एकता असोसिएशनसह संलग्र संघटनांची सोमवारी बैठक
  झाली. या बैठकीनंतर शहा म्हणाले, जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून व्यापार सुरू करण्याची ग्वाही दिली होती. पण पुन्हा लॉकडाऊनचा आदेश काढला. यापुढे प्रशासनाला कोणतेही – निवेदन देणार नाही. दुकानदारांकडून । दंड वसूल केला जात आहे. हा खंडणी वसूलीचाच प्रकार आहे. त्याचा निषेध आहे.

  शहा म्हणाले, पॉझिटिव्हीटी दरानुसार निर्बंधांचे निकष केवळ महाराष्ट्रातच आहेत. इतर राज्यात लॉक अथवा अनलॉक हे दोनच पर्याय आहेत. कडक निर्बंध लादूनही जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंद असताना रुग्णसंख्या घटलेली नाही. व्यापाऱ्यांच्या नुकसानीचा बोजा मात्र वाढत चालला आहे.

  आमदार, खासदार, नगरसेवकांनीही आंदोलनात सहभागी व्हावे, अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांनीही बुधवारी लाक्षणिक बंद पाळावा, असे आवाहन शहा यांनी केले.