सांगलीत हळद, बेदाणा, गुळाचे सौदे सुरू ; फळ, भाजी मार्केटमधील उलाढालही पूर्ववत: नियमांचे पालन न केल्यास कारवाई

धान्य लाईन विभागमधील होलसेल दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु करण्यात आली आहेत. धान्य पेठेत दुचाकी व चारचाकी व वैयक्तिक वाहने यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. धान्य विभागामधील माल उतरण्याचे काम दुपारनंतर सुरु ठेवण्यात येईल. किरकोळ विक्री करणाऱ्यांचे सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या बरोबरच विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये सकाळी ७ ते ११ या वेळेतच केवळ ओळखपत्रधारक व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल.

  सांगली : सांगली जिल्ह्यातील हळद, बेदाणा प्रसिद्ध आहे. सांगली मार्केट यार्डात हळद, गूळ, बेदाणे सौदे सुरू झाले. तसेच फळ व भाजी मार्केटही पूर्ववत सुरू झाले आहे.

  कोरोना लॉकडाऊनमुळे ५५ दिवसानंतर पहिल्याच सांगलीतील बेदाणा सौद्या मध्ये ६० टन आवक झाली होती, सुमारे २०० रुपये प्रति किलो इतका उच्चांकी मिळाला. चांगल्या प्रतीचा बेदाणा १४० ते २०० रुपये, मध्यम प्रतीच्या मालास १०० ते १५० रुपये, काळा बेदाना ४० ते ५० रुपये प्रति किलो असा दर मिळत होता. त्यावेळी असो. चे अध्यक्ष राजेंद्र कुंभार, दिगंबर यादव,तुषार शहा, आमित पटेल,विनायक हिंगमिरे,पवन चौगुले , श्रवण मर्दा ,राजू शेटे, रसिकभाई पटेल,अजित पाटील, आप्पासो आरवाडे,सचिन चौगुले, कुमार दरूरे आधी सह व्यापारी उपस्थित होते.

  दरम्यान गुरुवारी १७७७ क्विंटल राजापुरी हळदीची आवक झाली. हळदीस प्रति क्विंटल जास्ती जास्त ११ हजार, कमी ६ हजार तर सरासरी ८७०० दर मिळाला. गूळ’ सौद्यामध्ये ३०५० क्विटंल गुळाची आवक झाली. गुळास प्रतिक्विंटल जास्ती-जास्त ३७७० व सरासरी ३४१० दर मिळाला.

  तसेच धान्य लाईन विभागमधील होलसेल दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु करण्यात आली आहेत. धान्य पेठेत दुचाकी व चारचाकी व वैयक्तिक वाहने यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. धान्य विभागामधील माल उतरण्याचे काम दुपारनंतर सुरु ठेवण्यात येईल. किरकोळ विक्री करणाऱ्यांचे सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या बरोबरच विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये सकाळी ७ ते ११ या वेळेतच केवळ ओळखपत्रधारक व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल.

  हळद, गूळ, बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत घेऊन यावा. तसेच नियमाचे संबंधित घटकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील व सचिव महेश चव्हाण यांनी दिला आहे.

  जिल्हाधिकाऱ्यांनी ठराविक वेळेत सौदे काढण्याच्या अटीवर मार्केट कमिटी प्रशासनाला परवानगी दिली आहे. पण सौद्यात न येता कोरोना नियमाचे उल्लंघन करत एमआयडीसीत स्टोरवर दिवसभर जमाव जमवून आठ ठिकाणी सौदे काढल्याची जोरदार चर्चा आहे.मार्केटात न येता जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावून स्टोरवर बेदाणे सौदे काढल्यास तहसीलदार यांच्या वतीने संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

  - दिनकर पाटील , सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती

  शेतकरी, व्यापाऱ्यांना दिलासा

  मार्केट यार्ड गेली महिनाभर बंद होते. यामुळे शेतकरी, व्यापारी, हमाल, वाहतूकदार यासह अन्य घटक अडचणीत आले होते. कोट्यवधींची उलाढाल यामुळे ठप्प झाली होती. शेतीमाल शेतात कुजून जात होता. किरकोळ विक्रेत्यांचे जगणे मुश्कील झाले होते. परंतु उलाढाल पूर्ववत झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.