चप्पल घालून मंदिरात गेल्याने तुंबळ हाणामारी, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या भावासह १२ जणांवर गुन्हे

मासाळवाडी गावात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आलेल्या काहीजणांनी चप्पल न काढताच मंदिरात प्रवेश केला. ते पाहून काही उपस्थितांनी त्यांना जाब विचारला. चप्पल घालून मंदिरात का प्रवेश केला, अशी विचारणा केली. आपल्याला अशी विचारणा केल्याचा राग चप्पल घालून येणाऱ्यांना आला आणि त्यांनीही ग्रामस्थांना उद्धट भाषेत प्रत्युत्तर दिले. त्यामुळे वादाची ठिणगी पडली आणि वाद चांगलाच पेटला.

मंदिरात चप्पल घालून प्रवेश करण्याच्या मुद्द्यावरून सांगली जिल्ह्यात जोरदार राडा झाला. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात मासाळवाडी गावात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या प्रकरणात १२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावाचाही त्यात समावेश आहे.

मासाळवाडी गावात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आलेल्या काहीजणांनी चप्पल न काढताच मंदिरात प्रवेश केला. ते पाहून काही उपस्थितांनी त्यांना जाब विचारला. चप्पल घालून मंदिरात का प्रवेश केला, अशी विचारणा केली. आपल्याला अशी विचारणा केल्याचा राग चप्पल घालून येणाऱ्यांना आला आणि त्यांनीही ग्रामस्थांना उद्धट भाषेत प्रत्युत्तर दिले. त्यामुळे वादाची ठिणगी पडली आणि वाद चांगलाच पेटला.

चप्पल घातलेले आणि जाब विचारणारे असे दोन गट निर्माण झाले. वातावरणातील तणाव वाढत गेला. एका गटाने तिथं उभ्या असलेल्या दोन दुचाकींची तोडफोड केली. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांचा समावेश आहे. मात्र या घटनेशी आपला काहीच संबंध नसल्याचा खुलासा पडळकर यांनी केला आहे.