लॉकडाऊनमुळे आली बेरोजगारीची वेळ ; प्रसिद्ध लेखकाची दयनीय परिस्थिती

लॉकडाऊनमुळे (Lockdown) साहित्य विश्वात आपला ठसा उमटवणारे प्रसिद्ध लेखक (Author ) प्रा. नवनाथ गोरे (Navnath Gore) यांनी हातातील लेखणी बाजूला ठेवून कुदळ व फावडे घेतले आहे. खरं पाहता त्यांच्यावर ती वेळ आली आहे. २०१८ मध्ये नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ या कादंबरीला साहित्य विश्वातील अत्यंत मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला.

 सांगली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे (Corona Virus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) साहित्य विश्वात आपला ठसा उमटवणारे प्रसिद्ध लेखक (Author ) प्रा. नवनाथ गोरे (Navnath Gore) यांनी हातातील लेखणी बाजूला ठेवून कुदळ व फावडे घेतले आहे. खरं पाहता त्यांच्यावर ती वेळ आली आहे. २०१८ मध्ये नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ या कादंबरीला साहित्य विश्वातील अत्यंत मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला. आयुष्यातील चढ-उतार व कटू वाटणाऱ्या सत्यावर आधारीत या कादंबरीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या कादंबरीनंतर नवनाथ यांचं आयुष्य बदललं.

अहमदनगर  जिल्ह्यातील (Ahmednagar District)  लोणी या गावी पद्मभूषण विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयात तासिता तत्त्वावर नोकरी लागली. त्यांना महिन्याला १० हजार पगार मिळत होता. त्यामुळे परिस्थितीत बऱ्याच अंशी बदलली होती. तसेच त्यांच्यावर सहयोगी प्राध्यापकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मात्र अवघ्या ६ महिन्यातच कोरोनाचं सकंट आलं आणि लॉकडाऊनमुळे अनेक सेवा तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्यात आल्या. त्यात त्यांची नोकरी गेली. त्यामुळे त्यांनी मोलमजुरी करुन आपल्या संसाराचा गाढा पुढे नेण्यासाठी ते ८ ते १० तास राबून २०० रुपयांवर काम करीत आहेत.