आमणापूर बसस्थानकाजवळ अज्ञात शिवप्रेमींनी रात्रीत उभारला छ.शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा

हा पुतळा उभारण्यापुर्वी चौकातील ग्रामसचिवालयावरील ग्रामपंचायतीच्या दोन सीसीटीव्ही कॅमेर्यांची दिशा बदलण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे.सोमवारी सकाळी चौकात पुतळा प्रकटल्याची गोष्ट समताच अनेकांनी चौकात येऊन 'झालं ते चांगलं झालं' म्हणत या पुतळ्याचे दर्शन घेतले.

    सांगली : पलुस तालुक्यातील आमणापूर हे स्वातंत्र्य सैनिकांचे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. पण या आजवर ऐकही पुतळा नव्हता. तर छ.शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची इच्छा शिवप्रेमींच्या मनात खदखदत होती. तर आज आमणापूर मध्ये पलुस येथील घटनेची पुनरावृत्ती पहायला मिळाली आहे.
    रविवारी मध्यरात्री नंतर काही अज्ञात शिवप्रेमींनी आमणापूर बसस्थानक चौकात छ.शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा उभारला आहे.

    तर हा पुतळा उभारण्यापुर्वी चौकातील ग्रामसचिवालयावरील ग्रामपंचायतीच्या दोन सीसीटीव्ही कॅमेर्यांची दिशा बदलण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे.
    सोमवारी सकाळी चौकात पुतळा प्रकटल्याची गोष्ट समताच अनेकांनी चौकात येऊन ‘झालं ते चांगलं झालं’ म्हणत या पुतळ्याचे दर्शन घेतले.दरम्यान, रात्रीत उभारलेल्या या पुतळ्याची चर्चा दिवसभर गावात चवीने चर्चीली जात होती. तर शिवप्रेमीकडून या पुतळ्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे