केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या पोस्टरला सांगलीत काळे फासले

रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून " मी असतो तर कानाखालीच चढवली असती " असे विधान केले, याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत, त्यातूनच राज्यात काही ठिकाणी राणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, तर विविध पोस्टरद्वारे निषेध व्यक्त होतो आहे.

    सांगली :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणात जन आशिर्वाद यात्रे दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले, याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत, या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सांगलीत भाजपच्या पोस्टरवरील नारायण राणे यांच्या फोटोला युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळ फासले आहे.

    रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून ” मी असतो तर कानाखालीच चढवली असती ” असे विधान केले, याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत, त्यातूनच राज्यात काही ठिकाणी राणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, तर विविध पोस्टरद्वारे निषेध व्यक्त होतो आहे.

    सांगलीतील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील कार्यालयासमोर नूतन केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अभिनंदनाचा डिजिटल लावण्यात आला आहे. या डिजिटलवर पहिला फोटो नारायण राणे यांचा होता, याच फोटोवर आज सकाळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकून निषेध व्यक्त केला आहे.