grapeyard

तासगाव(tasgav) तालुक्यातील अनेक गावांना काल रात्री अवकाळी पावसाने(rain) झोडपले. यावेळी वादळी वाऱ्यामध्ये तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी येथील तीन, सावळज येथील दोन आणि मणेराजुरी येथील एक अशा सहा द्राक्षबागांचे नुकसान(farmers loss) झाले आहे.

    तासगाव : तासगाव(tasgav) तालुक्यातील अनेक गावांना काल रात्री अवकाळी पावसाने(rain) झोडपले. यावेळी वादळी वाऱ्यामध्ये तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी येथील तीन, सावळज येथील दोन आणि मणेराजुरी येथील एक अशा सहा द्राक्षबागांचे नुकसान(farmers loss) झाले आहे. या द्राक्षबागा भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे ५२ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाने द्राक्षबागांच्या नुकसानीचे(crops loss) पंचनामे केले आहेत.

    द्राक्षबागांशिवाय गहू, शाळू, हरभरा, मका तसेच पालेभाज्यांचेेही नुकसान झाले आहे. तसेच अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. रस्त्यावरची काही झाडेही उन्मळून पडली आहेत. अशातच वीजपुरवठाही बराच काळ खंडित झाला होता. बुधवारी रात्री उशीरा अवकाळी पाऊस सुरु असताना सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे बागेतील स्टेजिंगचा तोल बिघडला. द्राक्षांचे वजन पेलू न शकल्याने तारा तुटून बागा कोसळल्या.