वैभव साबळे इस्लामपूर नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी

इस्लामपूर नगरपालिकेला अखेर नवीन मुख्याधिकारी मिळाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहणारे वैभव साबळे (Vaibhav Sable) यांची इस्लामपुरला मुख्याधिकारी म्हणून बदली झाली.

    वाळवा : इस्लामपूर नगरपालिकेला अखेर नवीन मुख्याधिकारी मिळाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहणारे वैभव साबळे (Vaibhav Sable) यांची इस्लामपुरला मुख्याधिकारी म्हणून बदली झाली असून शासनाचे अवर सचिव सचिन द. सहस्त्रबुद्धे यांनी या बदलीचे आदेश काढले आहेत.

    गेल्या अडीच ते तीन महिन्यापुर्वी इस्लामपूरचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांची पदोन्नतीवर पंढरपूर येथे बदली झाली होती. काही महिन्यातच मुख्याधिकारी माळी यांची बदली झाल्याने प्रशासकीय पातळीवरील अनेक कामे व निर्णय खोळंबले आहेत.

    इस्लामपूर नगरपालिका निवडणूक नजीकच्या काळात होणार आहे. पालिकेच्या विविध शॉपिंग सेंटरमधील गाळे अनामत रक्कम व भाडेवाढीसह लिलाव प्रक्रिया सुरु झाली होती. या प्रक्रियेस गाळेधारकांनी विरोध केला. तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. मात्र, काही पक्ष व संघटना लिलाव होण्यासाठी आग्रही आहेत. अशी अनेक आव्हाने नवे मुख्याधिकारी साबळे यांच्या समोर राहणार आहेत.