विजय वडेट्टीवारांनी ‘महाज्योती’ संस्थेची ‘येड्याची जत्रा अन् खुळ्याची चावडी’ करून टाकली : गोपीचंद पडळकर

विजय वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत ओबीसी व भटक्या विमुक्त जाती यांचा छळ करण्याचा जणू काही विडाच उचलला आहे. MPSC - UPSC विद्यार्थ्यांच्या भविष्याचा कडलोट होतोय.

    सांगली:अतिसन्माननीय विजय वडेट्टीवारांनी(Vijay Vadettiwar) आपल्या गलथान कारभारातून महाज्योती संस्थेची ‘येड्याची जत्रा अन् खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे. तीन दिवसात कोणतीही पुर्वसुचना न देता महाज्योती UPSC च्या विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षा घेतंय. अशी खोचक टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर(BJP MLA Gopichand Padalkar) यांनी वडेट्टीवार यांच्यावर केली आहे.

    विजय वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत ओबीसी व भटक्या विमुक्त जाती यांचा छळ करण्याचा जणू काही विडाच उचलला आहे. MPSC – UPSC विद्यार्थ्यांच्या भविष्याचा कडलोट होतोय. काल कुठलीही पुर्वसुचना न देता १३ सप्टेंबरला अचानकपणे UPSC चाळणी परिक्षेचे आयोजन केले आहे. आता तीन दिवसात विद्यार्थी येणार कधी परिक्षा देणार कधी? UPSC चे उमेदवार दिल्ली येथे तयारी करण्यासाठी गेलेले असतात. काहींची १० ऑक्टोबरला पूर्व परिक्षा आहे तर काहींच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती आहेत.

    विजय वडेट्टीवार यांनी आपल्या गलथान कारभारामुळे ओबीसी व भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी असणाऱ्या‘महाज्योती’ संस्थेला ‘यड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे. मी या प्रस्थापितांच्या सरकारला इशारा देतो की, चाळणी परिक्षा तुम्ही विद्यार्थ्यांशा चर्चा करून पुर्ननियोजीत केली नाहीतर आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.