chandrakant patil

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत असतना मुख्यमंत्र्यांवर टीका करत निशाणा साधला आहे. आम्ही मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडणार आहेत. आगामी काळात यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलने करावी लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सांगली : राज्यात परतीच्या पावसामुळे (Rain) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Huge loss Of farmers) झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पीकांचे आतोनात नुकसान (Crops) झाले. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला  (Helpless Farmers) आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याची आशा सरकारच्या नुकसान भरपाईवर आहे. नुकसान झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी सर्व नेते बांधावर जात आहेत. परंतु उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घरी असल्यामुळे विरोधकांनी सडकून टीका केली आहे. नुकसान भरपाई देण्यासाठी घरात बसून चालत नाही. त्यासाठी बांधावर जावे लागते. असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत असतना मुख्यमंत्र्यांवर टीका करत निशाणा साधला आहे. आम्ही मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडणार आहेत. आगामी काळात यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलने करावी लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच सत्ताधारी पक्षातील काही आमदार सरकारमधून बाहेर पडण्यासाठी आग्रही असल्याचा दावाही पाटील यांनी केला. विरोधक आक्रमक झाले तर आपली आमदारकी धोक्यात येईल, अशी भीती सत्ताधारी पक्षातील काही आमदारांना वाटत आहे. त्यामुळे हे आमदार स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांवर सरकारमधून बाहेर पडण्याासाठी दबाव आणत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मात्र, शरद पवार आणि अजित पवार हे अनुक्रमे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी अगोदरच बाहेर पडले आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील उद्यापासून अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही कोकणातील नुकसानग्रस्त भागाला भेट देणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारभार करण्याची कार्यपद्धती विरोधकांच्या टीकेचा विषय ठरत आहे.