bullock cart race

महाराष्ट्राची शान आणि भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांची ओळख असलेल्या बैलगाडा छकडा शर्यतीचे कपटाने नामोनिशाण मिटवण्यासाठी हे राष्ट्रवादीचे लोक निघाले आहेत. यांना मागील दोन वर्षांपासून ना तारीख काढता आली, ना अध्यादेश काढता आला. जेव्हा मी स्पर्धेचे आयोजन केले, तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसोबत बैठका घेऊन असे भासवले की आमचा छकडा शर्यतीला विरोध नाही. आता गृहखात्याच्या बळाचा वापर करत बैलगाडा शर्यतीच्या स्थानावर नाकाबंदी करून राष्ट्रवादीने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप  गोपिचंद पडळकर यांनी केला.

    सांगली: राष्ट्रवादीची बैलगाडा शर्यतीबद्दलची दुटप्पी आणि दुतोंडी भूमिका आता शेतकऱ्यांसमोर उघडी पडत आहे. भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांची ओळख आणि महाराष्ट्राची शान असलेल्या बैलगाडा छकडा शर्यती नामशेष करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात आहे. गृहखात्याच्या बळाचा वापर करत बैलगाडा शर्यतीच्या स्थानावर नाकाबंदी करून राष्ट्रवादीने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.

    बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगाणिस्तानवरून तालिबानी तर येणार नाहीत, अशा शब्दात भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला खडेबोल सुनावले आहे.