वाई विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी १३३ कोटी ९० लाख निधी मंजूर : आमदार मकरंद पाटील

वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील गावांना रस्त्यांच्या सुविधा चांगल्या असाव्यात यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी नेहमीच कटाक्षाने लक्ष घातले आहे . राज्यातील सर्वाधिक मोठा मतदारसंघ असतानाही प्रत्येक गावच्या मुलभूत सुविधांकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले आहे .

    कवठे : वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातील वाहतूकीची सुविधा अधिक सुरळीत व्हावी , ग्रामीण भागातील लोकांच्या दळणवळणाचा मार्ग सुखर व्हावा यासाठी राज्य अर्थसंकल्पातून विविध रस्त्यांच्या कामासाठी रुपये १३३ कोटी ९० लाख मंजूर केल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली . त्यामुळे धार्मिक स्थळे , पर्यटन स्थळे आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होणार आहे .

    वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील गावांना रस्त्यांच्या सुविधा चांगल्या असाव्यात यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी नेहमीच कटाक्षाने लक्ष घातले आहे . राज्यातील सर्वाधिक मोठा मतदारसंघ असतानाही प्रत्येक गावच्या मुलभूत सुविधांकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले आहे . ग्रामीण भागातील लोकांच्या मागणीनुसार विविध रस्ते ,गटर्स बांधणे व पूल बांधणी करणे तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत मांढरदेवी देवस्थानच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वर्षभर लाखो भाविक येत असतात यासाठी वाई ते मांढरदेव रस्यार्साठी रुपये ६५ कोटीचा निधी उपलब्ध् करुन घेतला आहे. त्याचप्रमाणे महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा खोऱ्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटकांचा व स्थानिक ग्रामस्थांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य अर्थसंकल्पातून विशेष १५ कोटी निधी मिळवला आहे . त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे .

    या मंजुर कामांमध्ये वाई तालुक्यातील मांढरदेवी ते वाई रस्ता ( ६५ कोटी), बोपेगांव ते खानापूर रस्त्यावर पुल बांधकाम ( २ कोटी १६ लाख) , मेणवली ते वरखडवाडी फाटा रस्ता ( १ कोटी ) , भिवडी ते बलकवडी रस्ता ( २ कोटी ५० लाख) , बालेघर ते मांढरदेव रस्ता ( १ कोटी ), डुईचीवाडी ते बारसेवाडी रस्ता ( २ कोटी २५ लाख), शिरगांव ते किकली रस्ता ( २ कोटी ), बोपेगांव जाधववस्ती ते खानापुर फाटा रस्ता ( ४ कोटी), वाई मुस्लीम कब्रस्तान जवळ संरक्षक भिंत बांधकाम ( २ कोटी ), वाई बावधन नाका ते बावधन रस्ता दोन्ही बाजुस आर.सी.गटर्स ( २ कोटी ), देगांव गावठाण मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजुस आर.सी.सी.गटरचे बांधकाम ( १ कोटी), वाई पाचवड रस्त्यावर पुलाचे बांधकाम ( २ कोटी), चांदक येथील पोहोच रस्त्यासह पुलाचे बांधकाम ( १ कोटी ८० लाख), सटालेवाडी घाट येथील घाट लांबीची सुधारणा व रस्ते सुरक्षा उपाययोजना ( १ कोटी ३० लाख), राष्ट्रीय महामार्ग भुईज ते कारखाना रस्ता ( ३ कोटी), कुसगांव येथील पुलाचे बांधकाम ( ७० लाख) . तसेच खंडाळा तालुक्यातील – खंडाळा येथील शिवाजी चौक ते शिवाजीनगर रस्ता ( १ कोटी ५० लाख), लोणी भादवडे ते शिवाजीनगर रस्ता ( १ कोटी ५० लाख), लोहोम ते असवली रस्ता ( २ कोटी ), बावडा ते खंडाळा रस्ता ( १ कोटी ), धावडवाडी ते अहिरे रस्ता ( १ कोटी १० लाख), वाघोशी ते प्र.रा.मा.१५ (वाघोशी खिंड) रस्ता ( १ कोटी ), पाडळी येथील निकमवस्ती ते पाडळी रस्ता ( १ कोटी २५ लाख), कण्हेरी येथे पुल बांधणे ( १ कोटी २५ लाख) त्याचप्रमाणे महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते महाबळेश्वर रस्ता ( १५ कोटी), चतुरबेट येथील पुल बांधणे ( ५ कोटी ५० लाख), शिरवली ते कळमगांव रस्ता ( ३ कोटी ), चतुरबेट ते दाभेमोहन रस्ता ( २ कोटी ४० लाख), उचाट येथील पुलाचे बांधकाम ( २ कोटी ५० लाख), कळमगांव येथील पुल बांधणे. ( ६८ लाख), वेण्णादर्शन शासकीय विश्रामगृह सुधारणा (९० लाख) करणे.