सातारा जिल्ह्यात २०१ कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रूग्ण

  • गेल्या २४ तासांत सातारा जिल्ह्यात २०१ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तसेच जिल्ह्यातील चार कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ४ हजार ५० इतका झाला आहे. तर सातारा जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या मृत्यूची संख्या १३४ इतकी झाली आहे.

सातारा – सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत सातारा जिल्ह्यात २०१ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तसेच जिल्ह्यातील चार कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ४ हजार ५० इतका झाला आहे. तर सातारा जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या मृत्यूची संख्या १३४ इतकी झाली आहे. 

सातारा, कराड, फलटण व वाई तालुक्यातील प्रत्येकी १ अशा एकूण ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. तसेच वाई तालुक्यातील गणपती आळी, यशवतंनगर, रविवार पेठ, खानापूर येथे कोरोना रूग्णांची संख्या आढळून आली आहे. तसेच सह्याद्रीनगर, कवठे, परखंदी आणि कराड तालुक्यातील येवती येथील ठिकाणी कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. 

सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये गुरुवार पेठमध्ये एका २५  वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तसेच वाई येथील खासगी हॉस्पिटलमध्ये सोनगीरवाडी ता. वाई येथील ३५  वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.