१८व्या शतकातील २१६ सोन्याची नाणी साताऱ्याच्या संग्रहालयात

पिंपरी चिंचवड ( पुणे जिल्हा ) भागातील चिखलीत घराचे बांधकामासाठी खोदकाम सुरु होते. त्यावेळी तेथे मजुराला एक तांब्याचा गडवा सापडला. त्या गढव्याचे वजन ५२६ ग्रॅम एवढे असून, त्यात २१६ सोन्याची नाणी होती. त्या नाण्यांचे वजन २ किलो ३५७ ग्रॅम एवढे आहे

    सातारा : पुणे जिल्ह्यातील चिखली येथे घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना सापडलेली २१६ सोन्याची नाणी साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी याबाबतची मााहिती दिली. बाजारभावाप्रमाणे या नाण्यांची दीड कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे .

    पिंपरी चिंचवड ( पुणे जिल्हा ) भागातील चिखलीत घराचे बांधकामासाठी खोदकाम सुरु होते. त्यावेळी तेथे मजुराला एक तांब्याचा गडवा सापडला. त्या गढव्याचे वजन ५२६ ग्रॅम एवढे असून, त्यात २१६ सोन्याची नाणी होती. त्या नाण्यांचे वजन २ किलो ३५७ ग्रॅम एवढे आहे. ही नाणी सिराजउद्दीन मोहमंद बहादूर दुसरा याच्या काळातील असावीत, असा त्या नाण्यावर असलेल्या उर्दू अक्षरावरुन अंदाज बांधता येतो असे सातारा येथील शिवाजी संग्रहालयाचे सहायक अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी सांगितले . सध्या संग्रहालयात चांदी व तांब्याची सातशे नाणी असून सोन्याची प्रथमच नाणी संग्रहालयात दाखल झाल्याचे शिंदे यांनी सांगितले .

    पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखेने ती नाणी जप्त केली. त्यानंतर पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्याच्या संग्रहालयात ती सुपूर्द करण्यात आली यावेळी शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे, वरिष्ठ लिपिक गणेश पवार, कर्मचारी अजित पवार, कुमार पवार, विनोद मतकर, देवदास भांबळ उपस्थित होते .