अक्षय निकम हल्लाप्रकरणी ३ संशयित आरोपीना अटक

अक्षय नंदकुमार निकम वय २४ याच्यावर ३ तरुणांनी सत्तुर सारख्या धारदार शस्त्राने डोक्यात व शरीराच्या इतर भागात सपासप वार करुन गंभीर जखमी करुन आरोपींनी पलायन केले होते त्या दिवसा पासून पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकण्यास सुरवात केली होती

    वाई : वाई एमआयडीसीत अक्षय निकम या तरुणा वर वार करुन फरार झालेल्या ३ आरोपींना वाई पोलिसांनी २४ तासातच ताब्यात घेऊन त्यांच्या गुन्हा दाखल करुन गजा आड केले आहे.
    सविस्तर वृत्त असे कि दि, १५ रोजी रोजी रात्री ९\ ४५ वाजण्याच्या सुमारास रविवार पेठ येथील रहिवासी असलेला अक्षय नंदकुमार निकम वय २४ याच्यावर ३ तरुणांनी सत्तुर सारख्या धारदार शस्त्राने डोक्यात व शरीराच्या इतर भागात सपासप वार करुन गंभीर जखमी करुन आरोपींनी पलायन केले होते त्या दिवसा पासून पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकण्यास सुरवात केली होती अखेर मंगळवार दि, १६ च्या रात्री फरार असलेल्या तिनही आरोपींना पकडण्यास वाई पोलिसांना यश आले आहे जखमी अक्षय निकम यास जवळ पास २५०ते ३०० टाके पडल्याची माहिती समोर येत आहे