फलटणमध्ये कत्तलीसाठी आणलेली ३६ जनावरे पोलिसांच्या ताब्यात ; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

ता.११ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कुरेशीनगर येथे कत्तलीसाठी एका वाहनामध्ये जनावरे डांबल्याची माहिती पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांना मिळाली. यानंतर किंद्रे यांनी सहकारी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कुरेशीनगर येथे छापा टाकला असता त्यांना नगरपालिकेच्या शाळेजवळ दोन टेंपोमध्ये ३६ जनावरे आढळली. टेंपोनजीक असणारे हुसेन बालाजी कुरेशी, तय्यब आदम कुरेशी, अल्ताफ जमील कुरेशी, उमर अस्लम कुरेशी (सर्व रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण) व अल्लाउद्दीन सुलतान सय्यद (रा. फडतरवाडी, ता. फलटण) हे संशयित पोलिस दिसताच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

    सातारा : शहरातील कुरेशीनगर परिसरात पोलिसांनी कारवाई करत एका टेंपोमधून कत्तलीसाठी आणलेली ३६ जनावरे ताब्यात घेतली. या प्रकरणी शहर पोलिसांनी पाच संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून, हे संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळाले. या छाप्यात पोलिसांनी १७ लाख रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला आहे.

    याबाबत शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की ता.११ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कुरेशीनगर येथे कत्तलीसाठी एका वाहनामध्ये जनावरे डांबल्याची माहिती पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांना मिळाली. यानंतर किंद्रे यांनी सहकारी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कुरेशीनगर येथे छापा टाकला असता त्यांना नगरपालिकेच्या शाळेजवळ दोन टेंपोमध्ये ३६ जनावरे आढळली. टेंपोनजीक असणारे हुसेन बालाजी कुरेशी, तय्यब आदम कुरेशी, अल्ताफ जमील कुरेशी, उमर अस्लम कुरेशी (सर्व रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण) व अल्लाउद्दीन सुलतान सय्यद (रा. फडतरवाडी, ता. फलटण) हे संशयित पोलिस दिसताच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

    पोलिसांनी घटनास्थळी पाच लाख २१ हजार रुपये किमतीची पिकअप गाडी (एमएच ११ टी ५९९८) व त्यामध्ये २१ जर्सी जातीची वासरे व ११ लाख ८० हजार रुपये किमतीचा टेंपो (एमएच १२ एलटी ७६६६) व या गाडीमध्ये १० मोठे रेडे व पाच लहान रेडी त्यासोबत नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १७ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला. याप्रकरणी पाच जणांविरोधात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम व प्राणी छळ अधिनियमानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन रावळ करीत आहेत.