कराड शहरासाठी खास बाब म्हणून ५ कोटींचा निधी मंजूर : पृथ्वीराज चव्हाण

    कराड : कराड शहरात नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी “खास बाब” म्हणून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ५ कोटी इतक्या निधीची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाकडून ५ कोटी इतका निधी कराड शहरासाठी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी शहरातील गटार कामांसाठी खर्च केला जाणार आहे.

    कराड नगरपालिकेकडे कोरोना काळात महसूलमध्ये घट झालेली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे कराड शहरातील गटारे पाणी वाहून नेण्यासाठी क्षमता अपुरी पडत आहे. तसेच शहराच्या वाढीव वसाहतीमध्ये पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी गटारांची व्यवस्था नसलेने रस्ते लवकर खराब होत आहेत. अशा परिस्थितीत शहरातील नागरी सुविधा करण्यासाठी खास बाब म्हणून निधीची मागणी करण्यात आली होती.

    त्यानुसार कराड शहरासाठी ५ कोटी इतका निधी मंजूर झाला असून, तो निधी वितरित करण्याचे आदेश सुद्धा नगरविकास मंत्रालयाकडून शासन आदेशाद्वारे करण्यात आला आहे. या निधीद्वारे कराड शहरातील शनिवार पेठेतील लाहोटी प्लाझा इथून ते कृष्णा कोयना ऑटोमोबाईल ते हॉटेल संगम कॉर्नर इथपर्यंत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्याच्या कडेने गटारसाठी बंदिस्त पाईपलाईन करणे.

    तसेच नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीमधील सुमंगलनगर येथील 1 ते 7 गल्ली, याचसोबत मुजावर कॉलोनी, शांतीनगर, दौलत कॉलोनी, रेव्हेन्यू कॉलोनी, पोस्टल कॉलनी, सूर्यवंशी मळा आदी शहरातील या परिसरामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्याच्या कडेने गटारसाठी बंदिस्त पाईपलाईन करणेसाठी 5 कोटी इतका पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. या कामाची सुरुवात लवकरच प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.