कासच्या पठारावर पहिल्या दिवशी 85 पर्यटकांना प्रवेश

कास पठारावरील फुलोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झाला. ऑनलाईन पध्दतीने बुकिंग केलेल्या पर्यटकांपैकी 85 जणांना पठारावर प्रवेश देण्यात आला.

    सातारा : कास पठारावरील फुलोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झाला. ऑनलाईन पध्दतीने बुकिंग केलेल्या पर्यटकांपैकी 85 जणांना पठारावर प्रवेश देण्यात आला. पहिल्या टप्प्यात निसर्गाच्या मुक्त अविष्काराची लयलूट पर्यटकांनी अनुभवली.

    वारसास्थाळ असलेल्या कास पठारावरील रंगीबेरंगी रान फुलांचा फुलोत्सव आज पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रर्दुभावामुळे पठारावरील फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. मात्र, यावर्षी कोरोनाचे नियम पाळून हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असून, प्रति पर्यटक 100 रुपये प्रवेश शुल्क आकारला जात आहे. दुपारपर्यंत 85 पर्यंटकांनी कास पठारला भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटला.

    समीतीने 140 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची हंगामासाठी नेमणुक केली असुन, वाहनतळ, पिण्याचे पाणी, शौचालय, निवारा शेड, तिकीट घर, गाईड आदी व्यवस्था सुरळीत केल्या आहेत. पठारावर तुरळक फुले बहरली असल्याने पर्यटकांना कम्पाउंडच्या आत प्रवेश करायचा असल्यासच प्रवेश शुल्क आकारले जाईल. फुलांचे प्रमाण वाढल्यावर पर्यटकांना ऑनलाईन बुकींगनेच प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी वनसमितीचे अध्यक्ष मारूती चिकने, उपाध्यक्ष दत्ता किर्दत, गोविंद बादापूरे, सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर आखाडे, बजरंग कदम, पांडुरंग शेलार आदी उपस्थित होते.