पडळ खून प्रकरणी मनोज घोरपडे व प्रभाकर घार्गे सह १९ जणांवर गुन्हा दाखल

पडळ येथील साखर कारखान्यात कार्यरत असणारे केमिस्ट अधिकारी जगदीप धोंडीराम थोरात (वय ४०रा गोवारे, ता. कराड) यांचा मुत्यू झाला. त्यांचा मृत्यू मारहणीत झाल्याने गेली दोन दिवस चर्चा होती.

    सातारा : पडळ (ता. खटाव) येथील साखर कारखान्यातील अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गेंसह एकूण १९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जाबजबाब झाल्यानंतर खुनाचा आरोप झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी धरपकड सत्र सुरू केले असून या घटनेने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी, पडळ येथील साखर कारखान्यात कार्यरत असणारे केमिस्ट अधिकारी जगदीप धोंडीराम थोरात (वय ४०रा गोवारे, ता. कराड) यांचा मुत्यू झाला. त्यांचा मृत्यू मारहणीत झाल्याने गेली दोन दिवस चर्चा होती.

    जगदीप थोरात यांना कारखान्यावर नोकरी करत असताना साखरेची अफरातफर केल्याच्या कारणावरून कारखान्याचे संचालक मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, प्रभाकर घार्गे, महेश घार्गे, सनी क्षीरसागर, पीए. अंजनकुमार, अशोक नलवडे, शेडगे मामा व अनोळखी १० ते १२ इसमांनी फायबर काठी, ऊस, सळी तसेच लाथाबुक्यांनी दि १० मार्चच्या सायंकाळी साडेपाच ते आठ वाजण्याच्या दरम्यान मारहाण केली. थोरात यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्‍यांच्या कुटुंबीयांनी खुनाचा आरोप केला. तसे जाबजबाब पोलिसांनी घेतले.

    दरम्यान, थोरात यांना गंभीर जखमी करून त्यांचा खून केल्याने सरकारच्या वतीने कराड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी याबाबतची फिर्याद वडूज पोलिस ठाण्यात दिली आहे.