मुख्याध्यापक व शिक्षिकेला वनवा लावल्याप्रकरणी प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा

या आगीमध्ये वनविभागाचे अंदाजे ११ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे देणार्‍याच जबाबदार मुख्याध्यापक व शिक्षिका यांनीच पर्यावरणाची हानी केल्यामुळे वाई तालुक्यातील पर्यावरणप्रेमींसह या बेजबाबदार शिक्षकांविषयी संतापाची व्यक्त केला जात आहे.

    वाई: वाई तालुक्यात रेनावळे परिसरातील वनविभागाच्या २२ हेक्टर क्षेत्राला लागलेल्या आगीला जबाबदार धरत प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक शिवाजी पार्टे आणि शिक्षिका निलिमा खरात या दोघांना वाईच्या न्यायालयाने प्रत्येकी ५००० रुपयांची शिक्षा ठोठाविली आहे.

    या आगीमध्ये वनविभागाचे अंदाजे ११ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे देणार्‍याच जबाबदार मुख्याध्यापक व शिक्षिका यांनीच पर्यावरणाची हानी केल्यामुळे वाई तालुक्यातील पर्यावरणप्रेमींसह या बेजबाबदार शिक्षकांविषयी संतापाची व्यक्त केला जात आहे.

    मुख्याध्यापक शिवाजी लक्ष्मन पार्टे (रा. वेलंग) व शिक्षिका नीलिमा गणेश खरात (रा. रेनावळे ता. वाई) या दोन्ही जबाबदार शिक्षकांनी जिल्हापरिषद शाळेच्या आवारातील पाला-पाचोळा एकत्र करून आग लावली होती. यामधील पाला पाचोळा वार्‍याच्या प्रवाहाने उडून शेजारीच असणार्‍या गवताने पेट घेतला, व वनक्षेत्रातील २२ हेक्टर इतका परिसर जळून खाक झाला. याप्रकरणी वाई वनविभागाने या शिक्षकांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

    सदरच्या आरोपी विरुद्ध भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम २६(१)(ब)(फ) चे उल्लंघण झाले बाबत गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही शिक्षकांच्या विरोधात शनिवार दिनांक १३ रोजी आरोप पत्र दाखल करून दोघांना शनिवार दिनांक २० रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायलयाने ५००० रु. दंड जाहीर केला व दंड न भरल्यास २० दिवसांची साधी कैद जाहीर केली आहे. दोघांनीही १० हजार रुपये दंड भरलेला आहे.