‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ मध्ये रानगव्यांच्या कळपाचे दर्शन: पर्यटकांमध्ये पाहण्यासाठी उत्सुकता

कास पठारावर अनेक आजपर्यंत जंगली प्राणी आढळून आल्याच्या घटना घडल्या आहेत.अगदी अस्वलाच्या हल्ल्यात स्थानिक जखमी झाले आहेत.बिबट्या, रान डुक्करे असे प्राणी निदर्शनास येतात. परंतु गेल्या चार दिवसांपूर्वी कास पुष्प पठारावर चक्क रानगव्यांचा कळप पहायला मिळाला.

सातारा : ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ अशी जागतिक पातळीवर ओळख निर्माण करणाऱ्या कास पठारावर प्रथमच रानगव्यांच्या कळपाचे दर्शन झाले आहे. लाल, पिवळी, निळी,पांढऱ्या या विविध रंगाची आकर्षक फुले दरवर्षी पठारावर उमलतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या विषाणूमुळे घालण्यात आले लॉकडाऊन व पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी घालून दिलेल्या नियमामुळे पर्यटाकांना फुलांच्या वैविध्याचा आनंद घेता आला नाही. कास पठारावर अनेक आजपर्यंत जंगली प्राणी आढळून आल्याच्या घटना घडल्या आहेत.अगदी अस्वलाच्या हल्ल्यात स्थानिक जखमी झाले आहेत.बिबट्या, रान डुक्करे असे प्राणी निदर्शनास येतात. परंतु गेल्या चार दिवसांपूर्वी कास पुष्प पठारावर चक्क रान गव्यांचा कळप पहायला मिळाला.

पुष्प पठार अशी ओळख असलेल्या कास पठारावर जंगली प्राणाचा वावर वारंवार सातत्याने आढळून येतो. कधी बिबट्या, कधी अस्वल तरी कधी मोर पहायला मिळतात.पण रान गव्यांचे कळप आजपर्यंत कधी पाहिले नसल्याचे स्थानिक सांगतात.गेल्या चार दिवसांपूर्वी कास रस्त्यावर चक्क रान गव्यांचा कळप पर्यटकांना पहायला मिळाला. कास पठारावर हवा पालट करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना हे गवे पाहून थोडी भीती ही वाटली पण काहीवेळातच त्यांनी त्याचा आनंद घेतला. या पठारावर सुरुवातीला स्थानिकांनाही हा रान गव्यांचा कळप असेल असे वाटले नाही परंतु रान गव्ये पाहून स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटक ही अचंबित झाले. नुकतेच पुणे शहरात रान गव्याचा मृत्यू भीतीने झाल्याची घटना घडली.