चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पतीविरोधात गुन्हा दाखल

    महाबळेश्वर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना महाबळेश्वर येथे घडली. याप्रकरणी पती राजेंद्र महादेव जाधव (वय 55. रा. व्हॅलीव्हयुवरोड प्राथमिक शाळा क्र 2 च्या मागे, महाबळेश्वर) शोध घेण्यात येत आहे. राजेंद्र हा त्याच्या पत्नीला पेटवून पळून गेला असून, महाबळेश्वर पोलिस या नराधामाचा शोध घेत आहेत. दरम्यान, घटनास्थळास आज उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. शितल जान्हवे कराडे यांनी भेट दिली. महाबळेश्वर पोलीस नराधम पतीचा शोध घेत आहेत.

    माणुसकीला काळीमा फासणाऱ्या एका भयंकर घटनेने आज महाबळेश्वर हादरले. प्राथमिक शाळा क्र २ च्या इमारतीच्या मागे एका चाळीत वेण्णालेेक येथे घोडे व्यवसाय करणारा राजेंद्र महादेव जाधव हा पत्नी बायना व प्रकाश श्रीकांत व सचिन ही तीन मुले व एक मुलगी विद्या असे एकत्र राहतात. राजेंद्र हा व्यसनाधीन असून, तो रोज आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत. आज सकाळी पती घरी नसताना पावणे आठच्या दरम्यान पत्नी नैसर्गिक विधीसाठी गेली होेती. त्यावेळी पती हा घरी आला. त्याने पाहिले पत्नी घरात नाही व सर्व मुले ही झोपली आहेत. त्यावेळी या नराधमाने आपल्या चाळीतील घराला बाहेरून कुलूप लावले. घराशेजारी असलेल्या एका गल्लीत तो आपल्या पत्नीची वाट पाहत होता. त्यावेळी त्याच्या हातात प्लास्टिकचा एक मग होता. पत्नी घरी निघाली तेव्हा पती हे रस्त्यात उभे असलेले तिने पाहिले पत्नीजवळ येताच राजेंद्र जाधव याने आपल्या हातातील मगमध्ये असलेले पेट्रोल हे पत्नीच्या अंगावर टाकले.

    पेट्रोल टाकत असताना तो शिवीगाळ करून तुला आज मारून टाकतो, असे बोलत होता. शिवीगाळ करीतच त्याने पत्नीच्या अंगावरील साडीला आग लावली. पेट्रोलमुळे आग तात्काळ भडकली व पत्नीला आगीने वेढले पतीने पेटवून देताच पत्नीने टाहो फोडला व आरडाओरडा सुरू केला. पत्नीने आराडाओरडा केल्याने नराधम पतीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर तिचा आवाज ऐकून प्रत्यक्षदर्शींनी आग आटोक्यात आणली.

    दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वाई उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. जान्हवे कराडे यांनी आज दुपारी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.