Thaman of mysterious fever in Uttar Pradesh; Sensation of 100 deaths

डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियामुळे आजारी पडलो असेन म्हणून नागरिक अगदी करोनाच्या आरपीटीसीआर या तिन्ही आजारांच्या टेस्ट करत आहेत. मात्र, टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत. लक्ष्मी टेकडील व जवान हौसिंग सोसायटीतील सुमारे २० ते २५ घरातील ७० ते ८० नागरिकांच्या या टेस्ट निगेटिव्ह असून देखील त्यांना सध्या अनोख्या आजाराने त्रस्त आहेत.

    सातारा : सदरबझार परिसरात गेल्यात काही दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया साथीचे थैमान सुरु आहे. मात्र, यामध्ये काही रुग्णांच्या करोनासह डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनियासंदर्भातील रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. मात्र, त्यांना फुप्फुसला सूज व कमरेखाली थकवा जाणवत असून आजाराचे निदान होत नसल्याने अनेकजण सध्या या अनोख्या नव्या आजाराने त्रस्त आहेत. मात्र, नागरिकांनी आरोग्य विभागाला कळवून देखील त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

    सदरबझार परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे तिथे डेंग्यू, मलेरियासह, चिकगुनियाच्या साथीने अनेकजण आजारी पडलेत. अनेकजण खासगी डॉक्टर्सकडून उपचार घेत असून एकीकडे कोरोनाचा संसर्ग आणि दुसरीकडे या साथीच्या आजारांनी सदरबझारकर सध्या हैराण झाले आहेत.

    परिसरात डासांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर असून पालिकेकडून डासांची वाढ रोखण्यासाठी फवारणी केली जात आहे. मात्र, अजून उपाय योजना करण्याची आवश्यकता तिथे निर्माण झाली असून पालिकेने या परिसरात वाढलेल्या साथीच्या आजारांपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी पुढे आले पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच आरोग्य यंत्रणांनी तातडीने या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपाय योजना राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.

    या आजाराची नागरिकांची भीती
    डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियामुळे आजारी पडलो असेन म्हणून नागरिक अगदी करोनाच्या आरपीटीसीआर या तिन्ही आजारांच्या टेस्ट करत आहेत. मात्र, टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत. लक्ष्मी टेकडील व जवान हौसिंग सोसायटीतील सुमारे २० ते २५ घरातील ७० ते ८० नागरिकांच्या या टेस्ट निगेटिव्ह असून देखील त्यांना सध्या अनोख्या आजाराने त्रस्त आहेत. अंगदुखी, ताप, थंडी अशी लक्षणे असून ती कमी होत नसल्याने नागरिक भयभीत झालेत.