कातरखटाव येथे चारचाकी नाल्यात, जीवितहानी नाही

    वडूज : कातरखटाव (ता. खटाव) येथील बादशाही धाब्याजवळ असलेल्या छोट्या पुलावरुन कार (एमएच ११ बी डी ६४७२) रस्ता सोडून गेल्याने एकजण जखमी झाला.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, कलेढोण येथील निवृत्त पोलिस (नाव समजले नाही) आपल्या काही कामानिमित्त सातारा येथे जात होते. कातरखटाव येथील बादशाही धाब्याजवळच्या पुलावर आल्यानंतर समोरुन येणाऱ्या वाहनास जाण्यासाठी मार्ग मोकळा करुन देत असताना वाहनावरील ताबा सुटला. ताबा सुटल्याने कार पुलालगत असलेल्या नाल्यात कोसळली.

    परिसरातील लोकांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली व जखमी झालेल्या चालकाला गाडीतून बाहेर काढले. त्यांना ताबडतोब कातरखटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. चालकाला किरकोळ जखमा झाल्या असून त्यांची प्रकृती ठीक आहे.