दीड वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस अटक, म्हसवड पोलीसांची कारवाई

    म्हसवड : म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दीड वर्षापासून फरारी असलेला आरोपी प्रसाद हरिदास माने (वय २८, रा. काळचौंडी, तालुका माण, सातारा) यास कलढोण येथील पोल्ट्री फार्म येथे सापळा लावून जेरबंद करण्यात म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांना अखेर यश आले आहे.

    हा आरोपी गेली दीड वर्षे म्हसवड पोलिसांना गुंगारा देत होता. म्हसवड पोलीस वारंवार लोकेशननुसार या आरोपीच्या शोधात होते. हा आरोपी फरार काळात अहमदाबाद, गुजरात येथे वास्तव्यास होता. अनेकदा ही गोपनीय मोहीम अयशस्वी झाली. मात्र, या आरोपी काळ चौंडी (माण), कलेढोण ( खटाव) परिसरात सद्यस्थितीत वास्तव्यास असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळताच म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे व सहकारी यांना समजताच रात्रीच्या सुमारास पथकाने कलढोण येथे सापळा लावून पाठलाग करून जेरबंद करण्यात यश आले आहे. सदर आरोपीकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून भविष्यात हिंसक घटना घडू नयेत यासाठी सदर आरोपी ताब्यात घेण्यात अखेर म्हसवड पोलिसांना यश आले आहे.

    म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भविष्यात गुन्हेगारी, भांडणे, मारामारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे होऊ नयेत व सामाजिक सलोखा राखला जावा. या उद्देशाने अनेक गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी म्हसवड पोलीस कटिबद्ध असून गंभीर स्वरूपातील गुन्हेगारांना अटक करण्याची मोहीम तीव्र करण्यात येणार आहे.