कोरोना नियमाचे उल्लंघन करत पर्यटनासाठी आलेल्या ५०० पर्यटकांवर कारवाई

या उलट्या वाहणाऱ्या धबधब्याच्या पाण्यात चिंब भिजण्यासाठी पठारावर पर्यटक गर्दी करू लागले आहेत. परंतु शासनाच्या नियमानुसार कोरोना असल्याने पर्यटन क्षेत्रावर जाण्यास बंदी आहे. तरीही काही पर्यटक नियमांचे उल्लघंन करत जात आहेत.

    सातारा: कोरोना संपल्याच्या अविर्भावात अनके नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत आहे. मात्र हुल्लबाजी करत पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या तरुणांवर पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात प्रसिद्ध असलेला सडावाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने सडा वाघापूर येथे येत आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद असल्याने पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली आहे. मात्र तरीदेखील मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनस्थळावर येत असल्याने पाटण पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ५०० पर्यटकांवर कारवाई केली आहे.
    या उलट्या वाहणाऱ्या धबधब्याच्या पाण्यात चिंब भिजण्यासाठी पठारावर पर्यटक गर्दी करू लागले आहेत. परंतु शासनाच्या नियमानुसार कोरोना असल्याने पर्यटन क्षेत्रावर जाण्यास बंदी आहे. तरीही काही पर्यटक नियमांचे उल्लघंन करत जात आहेत. पाटण तालुक्यातील सडावाघापूर येथे आतापर्यंत १ लाखाहून अधिक दंड पोलिसांनी वसूल केला आहे. सडावाघापूर येथे जाण्यासाठी उंब्रज येथून चाफळ मार्गे आणि पाटण व तारळे येथून जाण्यासाठी मार्ग आहे. पोलिसांनी अनेकदा आवाहन करूनही पर्यटक जात असल्याने कारवाईचा दडुंका उगारला आहे.