सुभाष दळवी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार; पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते वितरण

    केळघर : सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०२० २१ साठी जिल्हा परिषद शाळा वागदरेचे मुख्याध्यापक सुभाष काशिनाथ दळवी यांना पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

    यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ सभापती मानसिंग जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

    सुभाष दळवी यांना पुरस्काराने सन्मानित केल्याबदल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांचे गटशिक्षणाधिकारी जावली अरुणा यादव विस्तार अधिकारी तोडरमल आणि चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रुमख मिलिंद जगताप, अरविंद दळवी, विजय देशमुख, मिलन मुळे, शंकर जांभळे, विजय शिर्के, सुरेश जेधे यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.