अकलूज पॅटर्न!  १४ वर्षाच्या मुलाची कोरोनावर मात,,अकलूजचे बालरोगतज्ञ डाॅ.अभिजीत बडवे यांचे यश…!!!

कोरोनाला घाबरून चालणार नाही,कोरोनाच्या 3rd wave मध्ये लहान मुलांना अधिक धोका संभवतो...मात्र सदर बाब लक्षात घेऊन,अकलूज पॅटर्नच्या अनुषंगाने मा.प्रांताधिकारी शमा पवार मा.तहसीलदार अभिजित निंबाळकर अकलूज,डाॅ.एम.के.इनामदार ,अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.श्रेणीक शहा,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ञ डाॅ.अभिजीत बडवे यांनी लहान मुलांसाठी कोरोना आजाराच्या उपचारासाठी आपल्या बालरुग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

    अकलूज : सहकार नगरी अकलूज येथील बालरोगतज्ञ डाॅ.अभिजीत बडवे यांच्या श्रीराम बालरुग्णालय,संग्रामनगर,अकलूज येथे १० दिवसांच्या अथक प्रयत्नाने एका १४ वर्षाच्या बालकाला कोरोनामुक्त करण्यात यश आले…आणि ते ही रेमडीसीव्हीर न वापरता…!

    कोरोनाला घाबरून चालणार नाही,कोरोनाच्या 3rd wave मध्ये लहान मुलांना अधिक धोका संभवतो…मात्र सदर बाब लक्षात घेऊन,अकलूज पॅटर्नच्या अनुषंगाने मा.प्रांताधिकारी शमा पवार मा.तहसीलदार अभिजित निंबाळकर अकलूज,डाॅ.एम.के.इनामदार ,अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.श्रेणीक शहा,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ञ डाॅ.अभिजीत बडवे यांनी लहान मुलांसाठी कोरोना आजाराच्या उपचारासाठी आपल्या बालरुग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

    त्याचप्रमाणे अकलूज शहरातील इतर बालरुग्णालयातही अकलूज बालरोगतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डाॅ.राजीव राणे-कविटकर,सचिव बालरोगतज्ञ डाॅ.नितीन एकतपुरे,बालरोगतज्ञ डाॅ.सुजीत गांधी यांच्या समन्वयातून ॲपेकस बालरुग्णालय, श्री बालरूगणालय,चाईल्ड केअर रुग्णालयात कोरोनाबाधीत लहान मुलांवर उपचाराची सोय उपलब्ध करून दिल्या आहेत…