farmer

मी शेतकरी असून कोणतेही पीक घेतले तरी त्याला रस्ता नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. शेतीच्या मशागतीसाठी केलेला खर्चही मिळत नाही. शेतीला रस्ता नसल्यामुळे व गांजाला चांगला भाव असल्यामुळे गांजा लागवड करण्यासाठी १ सप्टेंबर पर्यंत परवानगी द्यावी. प्रशासनाकडून परवानगी मिळेल असे गृहीत धरून मी गांजाची लागवड करीत आहे.

    सातारा : तारगाव, ता. कोरेगाव येथे स्वतःच्या मालकीची जमीन गट नं. १२७२ मध्ये माझ्या स्वतःच्या मालकीची एक एकर शेती आहे. त्यामध्ये गांजा लावण्यास परवानगी द्यावी, अशी खळबळजनक मागणी तळेगाव येथील शेतकरी सुनिल संपत मोरे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. चक्क गांजा लावण्याची परवानगी मागण्यात आल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयात या निवेदनामुळे एकच खळबळ उडाली होती.

    निवेदनात म्हटले आहे, मी शेतकरी असून कोणतेही पीक घेतले तरी त्याला रस्ता नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. शेतीच्या मशागतीसाठी केलेला खर्चही मिळत नाही. शेतीला रस्ता नसल्यामुळे व गांजाला चांगला भाव असल्यामुळे गांजा लागवड करण्यासाठी १ सप्टेंबर पर्यंत परवानगी द्यावी. प्रशासनाकडून परवानगी मिळेल असे गृहीत धरून मी गांजाची लागवड करीत आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत पालकमंत्री आणि तहसीलदार यांना पाठवण्यात आली आहे.