इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रसेच्या वतीने खटाव माण येथे आंदोलन

    वडूज : सुमारे दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्व जनतेमध्ये अतिशय निराशाजनक परिस्थिती असून, या काळात केंद्र सरकारने सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सुमारे दुपटीने वाढ केली आहे. यामध्ये पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, घरगुती गॅस आदींसह अनेक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील खटाव माणचे नेते रणजितसिंह देशमुख यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

    दिवसेंदिवस ही दरवाढ वाढतच असून जनतेला जगणंही अवघड झाले आहे. लॉकडाऊनमुळे जीवनशैली पूर्ण बदलून गेलेल्या जनतेला वारंवार मागणी करूनही केंद्र सरकार ऐकण्याच्या मनस्थितीत नसून भाववाढ कमी करू न दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरुन केंद्रातील मोदी सरकारच्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक व राष्ट्रीय काँग्रेसचे खटाव माणचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी पेट्रोल पंपावर आंदोलन करुन तीव्र निषेध नोंदवला. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.