टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात का? मराठा आरक्षणावर उदयनराजेंचा संतप्त सवाल

मराठा समाजातील लाखो तरुण विपरित परिस्थितीत आहेत . आरक्षणाचा प्रश्न आता सुटला नाही तर तो कधीच सुटू शकत नाही याची जाणीव मराठा समाजातील तरुणांना झाली असून, सरकारने गांभीर्याने घेतले नाही तर मराठा समाजातील तरुण टोकाचे पाऊल उचलू शकतात असा इशाराही उदयनराजे यांनी दिला आहे.

    सातारा : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची इच्छा दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्यही दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात का? असा संतप्त सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे .

    मराठा समाजातील लाखो तरुण विपरित परिस्थितीत आहेत . आरक्षणाचा प्रश्न आता सुटला नाही तर तो कधीच सुटू शकत नाही याची जाणीव मराठा समाजातील तरुणांना झाली असून, सरकारने गांभीर्याने घेतले नाही तर मराठा समाजातील तरुण टोकाचे पाऊल उचलू शकतात असा इशाराही उदयनराजे यांनी दिला आहे.

    मराठा आरक्षणाच्या विषयावर खासदार उदयनराजे भोसले यांचे मुंबईत सातत्याने गाठीभेटींचे सत्र सुरू आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गजांना उदयनराजे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेळोवेळी भूमिका मांडली.  मराठा आरक्षणाच्या संदर्भात कोणतेही ठोस चित्र स्पष्ट होत नसल्याने उदयनराजे यांनी आपला संताप परखड शब्दात व्यक्त केला आहे.