समता परिषदेच्या प्रदेश प्रवक्तापदी माणच्या प्रा. कविता म्हेत्रे यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत.आजवर समाजकारण व राजकारणात काम करीत असताना त्यांनी महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे व विरोधकाना घाम फोडण्याचे काम केले आहे.आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रात छ.शिवाजी महाराज, फुले,शाहू,आंबेडकर यांची विचारधारा पोहचविण्याचे काम त्या करीत आहेत.

    दहिवडी : माण तालुक्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात यशस्वी पणे कार्यरत असणाऱ्या व माणची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रा कविता म्हेत्रे यांचीअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आली असून नुकतेच त्यांना निवडीचे पत्र समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आले.यावेळी माजी खासदास समीर भुजबळ,माजी आमदार पंकज भुजबळ, बापू भुजबळ,प्रा.हरी नरके,समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बरोबर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

    धडाडीचे नेतृत्व गुण आणि ओबीसीच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या प्रा.कविता म्हेत्रे यांना छगन भुजबळ यांनी आधीच समता परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे.या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला आहे.भटके विमुक्त, इतर मागासवर्गीय, विशेष मागास वर्ग यांची जनगणना, पदोन्नती,क्रिमिलेअर अट, खाजगी संस्थात आरक्षण ,शिक्षण संस्थेत प्रवेश,नोकरभर्ती कपात अशा अनेक प्रश्नांवर जनजागरण करून,आंदोलन करून ओबीसी चळवळ भक्कम करण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत.

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत.आजवर समाजकारण व राजकारणात काम करीत असताना त्यांनी महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे व विरोधकाना घाम फोडण्याचे काम केले आहे.आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रात छ.शिवाजी महाराज, फुले,शाहू,आंबेडकर यांची विचारधारा पोहचविण्याचे काम त्या करीत आहेत.

    मी सावित्री बोलतेय या एकपात्री नाटकाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जनजागृती करीत आहेत.महाराष्ट्रात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.छगन भुजबळ यांनी दिलेल्या या जबाबदारीच्या माध्यमातून “समता परिषदेचे विचार गावागावात पोहचवून, भटके विमुक्त,इतर मागास वर्ग,विशेष मागास वर्ग यांच्या न्याय हक्कांसाठी प्रयत्नशील राहणार” असे प्रा.कविता म्हेत्रे यांनी सांगितले निवडी बद्दल त्यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर,पालकमंत्री बाळासाहेब पाटील,माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील,माजी राज्यमंत्री महादेव जानकर,आमदार रोहित पवार,माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आ.प्रभाकर घार्गे,श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व विविध सामाजिक संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले.