विकासाबरोबर सौदार्हाच्या वातावरणाची गरज : अशोकराव गोडसे

    कातरखटाव : विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे. लोकांची मागणी व निधीची उपलब्धता याचा ताळमेळ घालून विकासकामे होत असतात. मात्र, भौतिक विकास होत असताना गावोगावचे कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेमध्ये सौदार्हाचे वातावरण राहणे ही गरजेची बाब आहे, असे मत बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे यांनी व्यक्त केले.

    गोडसे यांच्यासह विसापूरचे माजी सरपंच राष्ट्रवादीचे नेते सागर साळुंखे यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी तर वडूजचे माजी सरपंच अनिल गोडसे यांची पुणे विभाग शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झालेबद्दल येरळवाडी येथील लोकेशन ग्रुप व धनजंय चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी चौगुले, भाजपचे तालुकाध्यक्ष घनजंय चव्हाण, माजी उपसभापती संतोष साळुंखे, ऍड. रोहन जाधव, डॉ. संतोष देशमुख, विनायक ठिगळे, ऍड. किसनराव खामकर, शिवाजी साबळे, संतोष दुबळे, शारदा भस्मे, शबाना मुल्ला, राणी शिंदे, सुरेखा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    गोडसे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल सर्वपक्षीय कार्यकत्यांच्या उपस्थितीत सत्कार होणे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. पदाच्या माध्यमातून भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.

    सागर साळुंखे म्हणाले, प्रस्तापितांच्या विरोधात मोठा संघर्ष करत सर्वसामान्यांची कामे केल्यामुळेच आपणाला इथंपर्यंत पोहोचता आले. पदाच्या माध्यमातून चव्हाण मित्र मंडळ व लोकेशन ग्रुपला चांगले पाठबळ दिले जाईल.

    यावेळी अनिल गोडसे, संतोष साळुंखे, चौगुले यांचीही भाषणे झाली. धनाजी शिवाजी चव्हाण यांनी स्वागत केले. धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. आयाज मुल्ला यांनी आभार मानले. कार्यक्रमास वरुडचे माजी सरपंच लालासाहेब माने, सोमनाथ साठे, प्रा. दिलीप भुजबळ, मोहनराव बागल, बाळूकाका इनामदार, बाळासाहेब जगदाळे-पाटील, गणपतराव खाडे-पाटील, अनिल कचरे, योगिता काळे यांचेसह विविध गावचे पदाधिकारी, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.