
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. मागील काही दिवसांत उदयनराजे भेटीगाठी वाढल्या आहेत. राजे नेमकी कसली तयारी करत आहेत हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल.
सातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. मागील काही दिवसांत उदयनराजे भेटीगाठी वाढल्या आहेत. राजे नेमकी कसली तयारी करत आहेत हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल.
उदनयराजे आणि शंभूराज देसाई यांची ही काही पहिलीच भेट नाही. यापूर्वी अनेकवेळा दोन्ही नेते एकमेकांना भेटले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसह मराठा आरक्षण तसेच इतर महत्वाच्या मुद्द्यांवर या दोन्ही राजेंमध्ये चर्चा झाली. उदयनराजे भोसले हे गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात उदयनराजेंनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या.