बॅटऱ्या चोरी करणारी टोळी एलसीबीकडून जेरबंद; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

    सातारा : कृष्णा नगर येथील जलसंपदा विभागाच्या बॅटरी चोरी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आवळल्या. या आरोपीकडून ८ सुस्थितीतील बॅटऱ्या व छोटा हत्ती टेम्पो असा ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना चोरीच्या बॅटऱ्या घेऊन तिघेजण संगमनगरकडून बॉम्बे रेस्टॉरंट चौकाकडे येत असल्याची माहिती मिळाली होती. धुमाळ यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे आणि त्यांच्या पथकाने बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सापळा रचला. पोलिसांना कोरेगाव बाजूने साताऱ्याकडे येणारा छोटा हत्ती टेंपो आढळून आला. पोलिसांनी टेंपोतील चालक व त्याच्या साथीदारांकडे टेंपो अडवून चौकशी केली असता त्यांनी जलसंपदा विभागाच्या संगमनगर येथील गोडाऊनमधून आठ बॅटऱ्या चोरल्या व त्या एका ठिकाणी विकायला जात असल्याची कबुली दिली. तीन आरोपींना पोलिसांनी अटक करून बॅटऱ्या व छोटा टेम्पो असा साडेचार लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला .

    पोलीस हवालदार उत्तम दबडे, कांतीलाल नवघणे, आशिष घाडगे, शरद बेबले, साबीर मुल्ला नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत यांनी कारवाईत भाग घेतला .