अजित पवारांना मोठा दणका ; साखर कारखान्या संबंधित त्यांच्या पत्नीबाबत ईडीकडून मोठा खुलासा..

जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढण्यात आला होता. २०१० मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने या कारखान्याचा लिलाव करुन गुरु कमॉडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला विकला होता.

    सातारा : महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. तसेच हा साखर कारखाना अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का असल्याचं समजलं जात आहे. ईडीने ६५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

    जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढण्यात आला होता. २०१० मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने या कारखान्याचा लिलाव करुन गुरु कमॉडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला विकला होता. हा व्यवहार बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरामध्ये झाला असून त्यासाठी घेतलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये नियमांचं पालन न केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

    गुरु कमॉडिटीजने हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला भाडेतत्त्वावर दिला. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेडकडे या कारखान्याचे सर्वांत जास्त शेअर्स आहेत. तपासामध्ये स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं आढळून आलं आहे, असं ईडीने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे.

    महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित २५ हजार कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याचसंदर्भात ईडीने ही कारवाई केली आहे. पीएमएलए कायद्यान्वये कारखान्याची जागा, इमारत, कारखाना आणि मशिनरी जप्त करण्यात आली.