बायोगॅस निर्मिती प्रकल्प फलटणच्या विकासाला पूरक : प्रा. सोनवलकर

    फलटण : सौरवी व सई क्लिन फ्युएल्स या सोनवडी खुर्द (ता. फलटण) येथील बायोगॅस इंधन निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगती बरोबरच तालुक्यातील युवकांना रोजगाराची संधी आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला पूरक ठरणारा प्रकल्प उभा रहात असल्याचे सई क्लीन फ्युएल्स प्रा. लि. कंपनीचे चेअरमन प्रा. संतोष सोनवलकर यांनी सांगितले.
    यावेळी प्रा. रमेश आढाव, रणजितसिंह भोसले, संजय चिटणीस, सचिन ननावरे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केलेे. प्रारंभी एमसीएल कंपनीच्या देशपातळीवरील ३० सदस्यांच्या पार्लमेंटरी बोर्डात प्रा. संतोष सोनवलकर यांची निवड झाल्याबद्दल आणि प्रकल्प उभारणीसाठी फलटणची निवड केल्याबद्दल अरविंद मेहता यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तालुक्यातील ४० ग्रामउद्योजकांनी १० हजार सभासदांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. विकास सरक यांनी सूत्रसंचालन केले. गणेश गरड यांनी आभार मानले.
    कंपनीच्या माध्यमातून जैव इंधन निर्मिती

    सोनवडी खुर्द (ता. फलटण) येथे एमसीएल संचलीत सौरवी व सई क्लीन फ्युएल्स प्रोडयुसर कंपनी आणि सई क्लीन फ्युएल्स प्रा. लि. कंपनीच्या इमारत पायाभरणी कार्यक्रम प्रसंगी प्रा. सोनवलकर बोलत होते. यावेळी अरविंद मेहता, प्रा. रमेश आढाव, सुभाष भांबुरे, महाराजा मल्टीस्टेटचे चेअरमन रणजितसिंह भोसले, ग्रीनवर्ल्डचे चेअरमन सचिन ननवरे, सोनवडीच्या सरपंच शालन सुर्यवंशी, उपसरपंच शरदराव सोनवलकर, प्रगतशील शेतकरी संजय चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती. कंपनीच्या माध्मातून वाहनांसाठी व स्वयंपाकासाठी जैव इंधन (सीएनजी), सेंद्रीय खत निर्मिती करण्यात येणार असून कंपनीच्या सभासदांना प्राधान्याने सवलतीच्या दरात आणि इतरांना रास्त दरात उत्पादने उपलब्ध करुन देणारी यंत्रणा कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येणार अाहे, असे प्रा. साेनवलकर यांनी सांगितले.

    स्वातंत्र्याच्या ७० वर्षाहून अधिक कालावधीत या कृषी प्रधान देशात शेती व शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविण्यात आल्या. मात्र आजही शेतमालाला रास्त दर देण्यात यश न आल्याने शेतीतून भरघोस उत्पादन घेऊनही शेतकरी सुखी, समाधानी झाला नसल्याची खंत प्रत्येकाच्या मनात आहे. ती शेतमाल प्रक्रिया उद्योगाद्वारे दूर करण्याची आवश्यकता अाहे.