Birthday Special: Udayan Raje's special surprise for Rani Saheb

खासदार उदयनराजे भोसले या नावात सारं काही आले. स्टाईल, आणि डॅशिंगपणा यामुळे उदयनराजे नेहमीच चर्चेत असतात. आता चर्चेत आले आहेत ते त्यांनी राणीसाहेबांना केलेल्या birthday wishes मुळे.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले या नावात सारं काही आले. स्टाईल, आणि डॅशिंगपणा यामुळे उदयनराजे नेहमीच चर्चेत असतात. आता चर्चेत आले आहेत ते त्यांनी राणीसाहेबांना केलेल्या birthday wishes मुळे.

राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे उदयनराजे फार कुटुंबवत्सल आहेत. त्यांचं त्यांच्या कुटुंबावर जीवापाड आहे. आज उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराणी यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसादिनी उदयनराजेंनी खास पोस्ट लिहून राणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचा मोठा वाटा असतो. राजकारण, समाजकारण तसेच माझ्या सुखदुःखात नेहमी मला साथ आणि सोबत देणाऱ्या माझ्या सहचारिणी राणीसाहेब आपणास वाढदिनी खूप खूप शुभेच्छा….आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा, अशा खास शब्दात त्यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत पोस्ट लिहून आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.